कीटकनाशके फवारतानी घ्यावयाची काळजी?

1.गळके किंवा फुटके फवारणी यंत्र वापरू नये.

2.औषध फवारणी यंत्रात भारतानी सांडू नये याची काळजी घ्यावी.

3.औषधी/कीटकनाशके फवारणीसाठी वापरलेला पंप तणनाशके फवारणीसाठी वापरू नये.

4.कीटकनाशकाची फवारणी करताना पूर्ण मनजे अंगभर कपडे घालावे

5.कीटकनाशकाचा वास घेणे टाळावे

6.कीटकनाशके प्राणी ,लहान मुले यांच्या पासून दूर किंवा उंच ठेवावी .

7.फवारणी करण्या आधी जेवण करून घ्यावे व फवारणी झाल्यास हात स्वछ साबणाने धुवुन घ्यावे.

8.कीटकनाशके वाऱ्याच्या दिशेने च फवारावे .विरोधी दिशेने फवारू नये.

9.शक्य असल्यास फवारणी करताना गॉगल,ग्लबस चा वापर करावा .

10.फवारणी करत असताना त्याच हाताने धूम्रपान,तंबाखू सेवन करु नये.

कापूस पिकावरील किडीची ओळख आणि निंयंत्रण-

कापूस पिकावरील किडीची ओळख-


1.तुडतुडे – पचरीच्या आकाराचे व फिकट हिरव्या रंगाचे असतात.


2.फुलकिडे-ही कीड बारीक असून फिकट पिवळसर रंगाची असते.


3.पांढरी माशी-रंगाने पांढरी कीड असून ती शरीरातुन चिकट गोड द्रव्य बाहेर टाकते .

नुकसान

1.पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषण करने.


2.पाने पिवळसर पडणे,पांढरी पडणे ,तपकिरी होणे.


3.पाने कोमेजून जाणे


4.बुरशी वाढणे .

निंयंत्रण


1.फिप्रोनील 5% -30 ते 45 ml प्रति 15लिटर पाणी.


2.Acetamapride 20% -15gm


3.असिफेट 75sp-12 gm


4.बूप्रोफिजिन 25 sc -30 ml


5.डियफेनथुराँन-50wp-15gm

तणनाशके वापरतांना कोणती काळजी घ्यावी?

1.विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके च वापरावी.

2.योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तणनाशकाचे प्रमाण घ्यावे.

3.प्रमाण कमी जास्त झाल्यास तणाचे निंयत्रण कमी होते किंवा पिकाला इजा होते.

4.Expire तणनाशके वापरू नये.

5.तानाशक फवरतानी स्वच्छ पाणी वापरावे.त्या मुळे तणनाशक प्रभावी होते.

6.तणनाशकासाठी वेगळा फवारा वापरावा आणि जर शक्य नसेल तर हाच फवारा दुसऱ्या फवारणी आधी 2 ते 3 वेळा साबणाने स्वछ धूवुन वापरावा.

7.तणनाशक फवारतानी जमिनीत ओल असावी

8.जोराच्या वाऱ्यात आणि पाऊस एक तासात पडेल असे वाटत असल्यास फवारणी टाळावी .

9.पोस्ट इमेरजन्स तणनाशके गवत किंवा तन 2 ते 3 पानावर असताना फवारावे जेणे करून त्याची वाढ होणार नाही.

How to use herbicide.

1.Use recommended herbicide according to crop.

2.Use proper or recommend dose of herbicide.

3. Less or excess dose of herbicide  affecting performance and crop health.

4.Dont use expired herbicide.

5.Use clean water for spreaying.

6.Use another spray pump for herbicide.

7.Soil moisture take in consideration.

माती परीक्षण करण्यासाठी नमुना घेतांनी काय करू नये.?

1.मातीचा नमुना पिकांची कापणी झाल्यासच घ्यावा.

2.जर पीक उभे असेल तर दोन्ही ओळीं च्या मधील जागेतून नमुना घ्यावा.

3.शक्यतो नांगरणी पूर्व नमुना घ्यावा.

4.विहीर,कालवा,बांध लागतच्या जागेचा टाळावा.

5.जनवराच्या गोठ्या लागत ची जागा ,शेणखत कचरा गोळा करण्याच्या जागेचा नमुना घेऊ नये.

6.जमिनीत खत टाकले असेल तर दोन तीन महिन्या नंतर नमुना घ्यावा त्या आधी घेऊ नये.

7.वेगवेगळ्या शेतातले नमुने एकत्र करू नये

8.नमुना घेण्यासाठी खताच्या पिशवी वापरू नये.

9.10 ते 12 ठिकाणची माती एकत्र करून नमुना तयार करावा.

निंबोळी अर्क चे महत्व / उपयोग

1.निम अर्क मध्ये निमंडीन या घटकामध्ये विष्णुविरुद्ध क्रिया करण्याची शक्ती असते.

2.ह्या घटकामुळे पिकावरील विष्णुजन्य रोगावर निंयंत्रन मिळवता येते.

3.तसेच निम अर्क मध्ये अझाडिरेक्टरीण घटक असतो ते किडीचा शरीरात घातक बदल घडून आणुन किडीला मारते.

4.पाण्यात मिसळणारे असल्या कारणाने आणि पिकावर फावरल्या असल्या कारणाने रीपेलट मनहून कार्य करते

6.कीटकांची कार्यक्षमता घटवते.

7.किटकावर synergetic इफेक्ट करते.

8.लिंबोळी अर्क ची सेल्फ लाईफ जास्त असते मनजे दीर्घ काळ उपयोगात आणता येते.

9.नैसर्गिक घटकाचे योग्य बॅलन्स लिंबोळी अर्क मध्ये असते त्या मुळे फवारणी करताना कुठली ही विषबाधा होत नाही.

10.अंडी आणि काही प्रमाणात अळ्या देखील नष्ट करते.

11.स्वस्त आणि उपयोगी

12. लिंबोळी अर्क चा वास येत असल्या मुळे पतंग पिकावर अंडी घालने टाळते.

13.किडीचे पिकावर खाणे बंद होते.

14.किडीला अपंगत्व येते.

15.निम अर्क मुळे मित्र कीड मरत नाही.

16-नियंत्रन होणारे किटक-मावा,तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी,ठिपक्यांची अळी, भुंगा,नाकतोडा,उंट अळी, पाने गुंडाळणारी अळी.

Nim Ark/Nimboli Ark

1.Neem ark has nimdin content which fight against virus.

2.It contains Azardactin which changes insect life growth process and kill insects.

3.water soluble natural been extract antifeedent

4.Reduces reproduction repellent.

5.synergetic effect with insecticide.

6.Effectively decreases insect and pest attack.

7.Longer self life.

8.Balanced composition that’s why it is not poisonous to human.

9.Insect stop feeding on crop

10.Avoid and kill egg as well as bowlworm.

11.It paralaised Insect.

12.Not kill beneficial insects.

13.Control Insect- Aphids,Jassid,White fly,spotted bollworm,Thrips,etc.

अमिनो ऍसिड चे कार्य.

1.सर्वांगीण विकासासाठी मदत करते

2.जास्त flowering लागण्यास मदत करते ,परिणामी जास्त फुल व फळ संख्या वाढते.

3. फुल,फळ आणि कळी गळू न जाण्यास मदत करते.

4.फळांची size वाढवते ,गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यास मदत करते.

5.पिकाला बुरशीजन्य आणि वायरल रोगापासून लढण्यास मदत करते.

6.डोस-3 ते 5 मिली प्रति लिटर पाणी

Amino Acid Role.

1.It stimulates overall growth.

2.Induces more flowering,flower and fruit.

3.Prevent shedding of buds,flowers and fruit.

4.Enlarge fruit size,improves quantity and yield.

5.It helps to fight against viral and fungal diseases.

6.Dose -3 to 5 ml per litre water.

Zyme चे महत्व

1.उगवण क्षमता वाढवते.

2.रोप आणि मुळाची वाढ होन्यास मदत करते.

3.जमीनी मधून मायक्रो (सूक्ष्म)आणि मॅक्रो नुट्रीयनट शोषनास मदत करते.

4.कमी पाण्यात झाडाला तग धरण्याची क्षमता पुरवते .किंवा तग धरण्यास मदत करते.

5.फुलसंख्या वाढविते.

6.परिणामी अधिक उत्पन्न आणि गुणवत्ता वाढवते.

https://www.facebook.com/marathaudojak7/

Design a site like this with WordPress.com
Get started