Lambdacyhalothrin 5% लेम्बडा सायलॉथ्रीन 5% कीटकनाशक.

लेम्बडा cyhalothrin 5% हे कन्टेन्ट असलेले कीटकनाशक बाजारात अनेक कंपन्या वेगवेगळ्या नावा ने विकतात उदा.सीजेंटा चे कराटे हे कीटकनाशक.

आज आपण याच कार्य आणि उपयोग आज थोडक्यात समजावून घेऊ जेणे करून हे कशा करिता वापरले जाते हे समजता येईल.

या कीटकनाशकाचा उपयोग कापूस,धान/भात,वांगी, टमाटे ,मिर्ची,मका,सोयाबीन,गहू,ऊस,भाजीपाला इ.या पिकामध्ये केला जातो .

लेम्बडा सायलॉथ्रीन 5% सर्व प्रकार च्या अळ्या ला निंयत्रीत करते.

तेला, कोकडा किंवा चुरदा, पाने गुंडाळनारी अळी,तण छेदक अळी, फळ छेदकअळी,मावा ,तुडतुडे, फुलकिडे इत्यादी कीटकांना निंयत्रीत करण्यासाठी याचा उपयोग करतात.

लेम्बडा सायलॉथ्रीन Contact आणि Systemic कीटकनाशक आहे त्या मुळे कीटकांवर आणखी प्रभावी नियत्रण मिळवण्यास मदत होते.

साधारणता 15 ते 20 दिवस हे किटनाशक किटकावर नियंत्रण करते.

ह्या कीटकनाशका वर पिवळ्या रंगाचा मार्क आहे मणजे हे थोडे कमी विषारी आहे सर्वात जास्त विषारी असणाऱ्या कीटकनाशका वर लाल निशाण येतो . तरी देखील हे कीटकनाशक वापरतानी काळजी घेण्याची गरज आहे .

पूर्ण अंगभर कपडे घालून च याची फवारणी करावी.

या कीटकनाशका मूळे अंगाची आग होणे किंवा जळजळ होणे असा त्रास होऊ शकतो त्या मुळे फवारणी करतांना योग्य ती काळजी घ्यावी .

जर अंगाची आग किंवा जळजळ होत असेल तर फवारणी झाल्यास निम साबणाने अंघोळ करावी जेणे करून जळजळ किंवा अंगाची आग लवकर कमी होईल .

डोस किंवा प्रमाण –                                         15 लिटर पाण्यामध्ये 30 ml हे प्रमाण वापरावे .

https://www.facebook.com/marathaudojak7/

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started