Lambdacyhalothrin 5% लेम्बडा सायलॉथ्रीन 5% कीटकनाशक.

लेम्बडा cyhalothrin 5% हे कन्टेन्ट असलेले कीटकनाशक बाजारात अनेक कंपन्या वेगवेगळ्या नावा ने विकतात उदा.सीजेंटा चे कराटे हे कीटकनाशक.

आज आपण याच कार्य आणि उपयोग आज थोडक्यात समजावून घेऊ जेणे करून हे कशा करिता वापरले जाते हे समजता येईल.

या कीटकनाशकाचा उपयोग कापूस,धान/भात,वांगी, टमाटे ,मिर्ची,मका,सोयाबीन,गहू,ऊस,भाजीपाला इ.या पिकामध्ये केला जातो .

लेम्बडा सायलॉथ्रीन 5% सर्व प्रकार च्या अळ्या ला निंयत्रीत करते.

तेला, कोकडा किंवा चुरदा, पाने गुंडाळनारी अळी,तण छेदक अळी, फळ छेदकअळी,मावा ,तुडतुडे, फुलकिडे इत्यादी कीटकांना निंयत्रीत करण्यासाठी याचा उपयोग करतात.

लेम्बडा सायलॉथ्रीन Contact आणि Systemic कीटकनाशक आहे त्या मुळे कीटकांवर आणखी प्रभावी नियत्रण मिळवण्यास मदत होते.

साधारणता 15 ते 20 दिवस हे किटनाशक किटकावर नियंत्रण करते.

ह्या कीटकनाशका वर पिवळ्या रंगाचा मार्क आहे मणजे हे थोडे कमी विषारी आहे सर्वात जास्त विषारी असणाऱ्या कीटकनाशका वर लाल निशाण येतो . तरी देखील हे कीटकनाशक वापरतानी काळजी घेण्याची गरज आहे .

पूर्ण अंगभर कपडे घालून च याची फवारणी करावी.

या कीटकनाशका मूळे अंगाची आग होणे किंवा जळजळ होणे असा त्रास होऊ शकतो त्या मुळे फवारणी करतांना योग्य ती काळजी घ्यावी .

जर अंगाची आग किंवा जळजळ होत असेल तर फवारणी झाल्यास निम साबणाने अंघोळ करावी जेणे करून जळजळ किंवा अंगाची आग लवकर कमी होईल .

डोस किंवा प्रमाण –                                         15 लिटर पाण्यामध्ये 30 ml हे प्रमाण वापरावे .

https://www.facebook.com/marathaudojak7/

प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असते त्याचे कार्य काय.

शेती करत असताना बरयाच वेळेस फवारणी साठी औषध खरेदी करत असताना दुकानदार प्लांट ग्रोथ रेग्युलेटर देत असतो . आपल्याला/शेतकरी बांधवाना वाटत दुकानदारांची कमाई असेल मनहून टॉनिक देतो. काही जण देत ही असतील ,पण नेमकं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असत आणि काय काम करत हे जाणून घेऊ म्हणजे ते खरेदी करायचं की नाही हे आपलं आपल्याला ठरवता येईल.

जास्त खोल न जाता साधं आणि सोप्या भाषेत मी आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतो.

प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असते.

अमिनो अमला वर आधारित, प्रथिने ,व्हिटॅमिन युक्त असा नेसर्गिक अर्क असतो.जे की पिकाला शारीरिक व रासायनिक शक्ती प्रदान करते .

प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय कार्य करते

ज्या मुळे पिकाला भरपूर ताकद मिळते किंवा या शक्ती चा उपयोग घेण्यास मदत करते.

जमिनीमधील जे आवश्यक तत्व असतात त्यांचे शोषण करण्यास मदत करते.

वातावरणात जे बदल होत असतात त्या बद्दलापासून रोपांचे संरक्षण करते.

तर काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर फुले लागन्याठी,काही फुलांचे गळणे कमी करण्यास मदत करतात.

तर काही रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करतात.

तर काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर उत्पादनाचा रंग,आकार व चव याची गुणवत्ता टिकवून ठेवणे किंवा गुणवत्ता वाढवण्यास मदत करतात.

What is Plant growth regulater

It is combination of Amino based, vitamins, Protiens which is derived Naturally .

Plant growth regulator uses

It helps absorption of essential elements from soil.

It Helps plant to fight against atmospheric changes.

It helps inciate flowering and prevents flower drop.

2,4-D गहू पीका वरील तणनाशक . 2,4-D Amine Salt 58%SL.

1.2,4-D Amine Salt 58%SL हे कन्टेन्ट असलेले तणनाशक बाजारात मिळेल .

2.विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावानी हे तणनाशक बाजारात उपलब्द आहे.

3.साधारणतः 100 ते 150 रुपये इतक्या किंमतीत मिळेल या मध्ये एक एकर ची फवारणी पूर्ण होईल. म्हणचे एकरी खर्च 100 ते 150 रुपये.

4.आता हे कार्य कसे करते तर हे क्लोरोफिल ब्लॉक करून तणाचे कार्य बंद करते त्या मुळे तण वाळून जाते .

5.साधारणतः पाच ते आठ तासात याचा परिणाम दिसायला सुरुवात होते.

6.हे तणनाशक जवळपास बऱ्याच प्रकार च्या तण ना नियंत्रित करते.

7.यामध्ये राई,गोखरू,दुधी,हजारदाना,जलकुंभी,मोठी दुधी, इत्यादी .

8.40 ते 50 ml प्रति पंपा ला 15 लिटर पाणी असे प्रमाण घेऊन फवारणी करावी .

9.या तणनाशकाचा वापराने बहुतांश तने निंयनत्रीत होतील.

10.साधारणतः 30 ते 35 दिवसांनी या तणनाशकाचा वापर करावा जेव्हा तने दोन किंवा पाच पानावर असतील त्या मुळे प्रभावी निंयत्रण करता येईल.

गहू पिकामध्ये तणनाशक कोणते फवारावे?

1.Metsufuron Methyl 20% Wp. हे कन्टेन्ट असलेले तणनाशक बाजारात मिळेल .

2.विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावानी हे तणनाशक बाजारात उपलब्द आहे.

3.साधारणतः 80 ते 100 रुपये इतक्या किंमतीत मिळेल या मध्ये एक एकर ची फवारणी पूर्ण होईल म्हणचे एकरी खर्च 80 ते 100 रुपये.

4.आता हे कार्य कसे करते तर हे तानाच्या आत जाऊन तणाचे कार्य बंद करते त्या मुळे तण वाळून जाते .

5.साधारणतः पाच ते आठ दिवसात याचा परिणाम दिसायला सुरुवात होते.

6.हे तणनाशक जवळपास बऱ्याच प्रकार च्या तण ना नियंत्रित करते.

7.यामध्ये राई,गोखरू,दुधी,हजारदाना,जलकुंभी इत्यादी .

8.एका पॅक मध्ये दोन पाऊच मिळतात त्यातला लहान पाऊच सुरुवातीला मिसळणे व नंतर सोलव्हेन्ट किंवा दुसरा पाऊच मिक्स करावा साधारणतः सहा ते सात लिटर पाण्यात हे एकत्र करून घ्यावे .

9.व नंतर पंपाला एक लिटर असे प्रमाण घेऊन फवारणी करावी .

10. या तणनाशकाचा वापराने बहुतांश तने निंयनत्रीत होतील.

11.साधारणतः 30 ते 35 दिवसांनी या तणनाशकाचा वापर करावा जेव्हा तने दोन किंवा पाच पानावर असतील त्या मुळे प्रभावी निंयनतरण करता येईल.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

6.लोह

1.कोवळी पाना च्या शिरामधील भाग पिवळसर होतो व

2.नवीन येणाऱ्या पाना च्या शिरामधील भाग पिवळसर होतो.

3.पाने पिवळी पडतात.

4.कमतरता अधिक असेल तर पिवळी पाने पांढरी होतात.

5.पिकाची वाढ खुंटते.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

5.मॅग्नेशियम

1.सुरुवातीला जुन्या पानांना पिवळसर रंग येतो.

2.कालांतराने नवीन पालविस पिवळसर रंग येतो.

3.जुन्या पाना च्या शिरा मधील भाग पिवळा पडतो .

4.पाने तपकिरी होऊन गळून पडतात.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

4.गंधक

1.नवीन येणारी पाने पिवळी पडतात.

2.नवीन येणारी पालवी पिवळी पडू लागते.

3.पिके परिपकव होणायास उशीर लागतो .

4.द्विदल पीकाच्या मुळा वरील गाठी चे प्रमाण कमी होते.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

3.पालाश

1.शेंडे गळतात.

2.पाना च्या कडा तांबडसर होतात.

3.पानावर तांबडे व पिवळसर टिपके पडतात या वरून पालाश या अन्नद्रव्य ची कमतरता आहे असे समजावे.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

2.स्फुरद

1.पाने गडद हिरवी होतात.

2.पाने जांभळी रंगाची होतात.

3. पानाचा आकार लांबट होतो.

4.पिकाची वाढ खुंटते.

5.मूळाची वाढ मंदावते.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

1.नत्र

1.भरलेली किंवा परिपकव झालेली पाने पिवळी पडू लागतात किंवा पिवळी पडतात.

2.जर कमतरता खूपच अधिक असेल तर पाने खालून आणि वरच्या बाजूने देखील पिवळी पडतात.

3.पिकाची वाढ होणे थांबते.

4.मुळा ची वाढ मंद होते किंवा थांबते.

5.नवीन फूट किंवा फुटवे कमी येतात.

6.फुलांचे प्रमाण कमी होते.

Design a site like this with WordPress.com
Get started